पर्यटन

धार्मिक स्थळे

1 दुर्गामाता मंदिर सुमारे ६५ मिलियन वर्षापूर्वी झालेल्या ज्वालामुखीतुन अंधेरी पश्चिम येथे असणारा गिलबर्ट हिल डोंगर तयार झाला आहे. हा डोगर काळया बेसॉल्ट खडकापासुन बनलेला असुन उभ्या सरळ खांबा सरळ प्रमाणे दिसतो. त्यांची उंची २०० फुट आहे. संपुर्ण आशिया खंडात असणारा असा हा एकमेव डोगरा आहे. या डोगराच्या माथ्यावर सुमारे ४५० वर्षापासुन स्वयंभु दुर्गामातेचे जागृत मंदिर आहे. दरवर्षी हनुमान जयंतीलरा मंदिरात मोठी यात्रा भरते.दुर्गामातेचा पालखी सोहळा असतो. त्यावेळेस हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. नवरात्र उत्सव,महाशिवरात्री,मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवार इत्यादी देखिल मोठया उत्स़ाहात येथे साजरे केले जातात
1 जोगेश्वरी गुंफा जोगेश्वरी गुंफा जमिनीखाली काही फुट असुन पुर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूनी प्रवेश आहे. प्रवेशव्दारात अडीचशे फुटाचे अंतर आहे. दोन्ही बाजुनी खाली उतरुन जाण्याकरिता बारा फुट रुद पायऱ्या आहेत. प्रवेशव्दाराचे अंतर लहान आहे. पश्चिमेकडील प्रवेशव्दार अर्धमंडप आहे. पूर्वे प्रवेशाशी लहान-मोठे असे तीन अर्धमंडप आहेत. त्यावरुन प्रवेशव्दार महत्वाचे मानले जाते. गुंफांच्या मध्यभागी असलेला सभामंडप आकाराने खुप मोठा,प्रशस्त आहे.मध्यभागी जोगेश्श्वरी देवीच्या मंदिराचा गाभारा आहे. सभामंडपाच्या दक्षिणेला भरभक्म खांबाची रांग असलेली मोठी पडवी आहे. तिथे कित्येक भटजी शांती किंवा पुजापाठ करताना दिसतात. दक्षिेणेला शंकराचे मंदिर आहे. तिथुन पुढे गेले की छोटेसे हनुमान मंदिर दिसत. पश्चिमेच्या पायथ्याशी गणपती मंदिर आहे. तिथे एक छोटा सभामंडप आहे. तिथे काही दगडी कोरीव मुर्ती भगनावस्थेत आढळतात.गोंगाट नसल्यामुळे आजुबाजुचे विदयार्थी तिथे अभ्यासासाठी येतात. जोगेश्वरी माता मंदिर,शिवशंकर आणि गणपती मंदिर हि सगळी मंदिर स्वयंभु असल्याच सागितले जात. महाशिवरात्री आणि नवरात्रीला इथे मोठा उत्स़व असतो. हिंदु शिल्प स्थापत्य़कलेवर बौध्द़ स्थापत्यकलेचा मोठा परिणाम झाला.
2 महाकाली लेणी महाकाली लेणी या कोडिवटी या नावाने ओळखले जातात. या लेणी मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्टिय उदयाननात वसलेल्या आहेत. हि डोगरावरील लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने,त्यांना महाकाळ असे असे म्हटले गेले आहे. महाकाली गुंफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले महाकालीचे मंदिरावरुन या लेण्यांना महाकाली हे नांव पडले आहे. लेण्यामध्ये बुध्दाच्या लेण्या आहेत. बुध्दाच्या एकुण १९ लेण्या असुन विविध स्तुपही पाहायला मिळतात. अंधेरी स्थानकावरुन बस,व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचु शकता. सन-२०१३ च्या सर्वेनुसार १२,३३४ चौ.कि क्षेत्राावर गुंफा विस्तारलेली आहे.

 

पर्यटन स्थळे

1 जुहू चौपाटी जुहु कोळीवाडा ते मोरांगांव अशी ४.५ कि.मी लांबीची चौपाटी लाभली आहे. हे स्थळे अंधेरी स्टेशनपासुन अंदाजे ४.कि.मी.असुन त्या ठिकाणी जाण्यासाठी बस,रिक्षा,टॅक्सीची सोय आहे. चौपाटीवर शनिवार,रविवार व इमत सुटीच्या दिवशी मोठया प्रमाणवर पर्यटक येत असतात.गणपती विर्सजन,छटपुजा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवुन सण साजरे करतात. चौपाटीवरील साफसफाईचे काम बृहन्मुबई महानगर पालिका करते.समुद्रात येणा-या भरती-ओहोटीचे फलक लावले आहे.समुद्रात घडु नये म्हणुन लाईफ गार्डची सोय केली आहे.
2 मढ किल्ला मौजे मढ येथे एक प्राचीन किल्ला आहे. सदर किल्याला जाण्यासाठी वर्सोवा गावातुन बोटीने मढ येथे जावून तेथुन अंदाजे २ ते ३ कि.मी. आत जावे लागते.तेथे जाण्यासाठी खजगी वहाने उपलब्ध़ आहेत. सदर किल्ला आज रोजी केंद्र सरकार एअर फोर्स (हवाई दल) यांचे ताबयात आहे. त्यामुळे तेथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही
3 माउंटमेरी अंधेरी तालुक्यामध्ये बांद्रा पश्चिमेस माउंटमेरी हे जत्रेचे ठिकाण आहे. दरवर्षी येथे मोठया प्रमाणावर लोक दर्शनासाठी येतात