अंधेरी तालुका

अंधेरी तहसिल हा मुंबई उपनगर जिल्हायातील तीन तालुक्यातील महत्वाचा तालुका असुन, संपूर्धपणे शहरीकरण झालेले आहे. या तालुक्याचे क्षेत्र ७२.१७ चौ.कि.मी. असुन गावांची संख्या २५ आहे. सदरची गावे तीन परिमंडळामध्ये विभागली असुन सजांची संख्या १२ आहे. तालुक्याचे बहुतांशी ९०% भाग अकृषिक वापरांखालील आहे. अंधेरी तहसिलच्या पश्चिम बाजुकडील गावे अरबी समुद्र किना-याला लागुन असुन हा तहसिल मुंबई बेटांचा एक भाग आहे.वांद्रे ते मढ असा सुमारे १०.१५ चौ.कि.मी. लाबीचा समुद्र किनारा आहे.तहसिलमध्ये पिकांची जमिन नाही. बहुतांश जमीन अकृषिक वापराखाली असल्याने शेती कर वसुल होत नसुन अकृषिक सा-याची रक्क़म व भाडेपटयाची रक्क़म ही मुख्य़ वसुली या तालुक्याकडून केली जाते. तसेच तालुक्यात कोणतीही दगडखाण नाही.

अंधेरी तहसिल हा मुंबई उपनगराचा एक भाग असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात याचा समावेश आहे. त्यामुळे पाणी पुरवठा डेनुज व्यवस्था सार्वजनिक आरोग्य़, नियोजन इ्रत्यादी बाबी महानगरपालिकेकडून पार पाडएयात येतात.टाटा व रिलायन्स़ या दोन कंपन्याकडुन वीज पुरवठा करण्यात येतो. सार्वजनिक आरोग्याबाबतची सर्व यंत्राण बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविली जाते. अंधेरी तालुक्यामध्ये कुपर हॉस्पिटल,देसाई हॉस्पिटल लिलावती हॉस्पिटल,एशियनहार्ट इन्सस्टिटयुट रिसर्च सेटर, कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटल ,गुरुनानक हॉस्पिटल, ईत्यादी मोठया प्रमाणत हॉस्पिटल असल्याने वेगवेगळया खजगी संस्थामार्फत तसेच धर्मदाय संस्थामार्फत चालवली जात असल्यामुळे त्याचा फायदा तहसिलच्या गोरगरीग जनतेला होता

या कार्यालयाच्या आस्थापनेवर एकुण स्थायी व अस्थायीपदे असुन एकुण पदापैकी पदे भ्रण्यात आलेली आहेत. व पदे रिक्त आहेत. मुख्येत्वे या कार्यालयामार्फत शेती वापराकडे असलेल्या जमिनीच्या ७/१२ मध्ये फेरुार घालणे,जमीन,महसुली करणे,गौण्खनिज स्वामीत्वधन व दंड वसुल करणे, चित्रपटगृहे,व्हिडिओ खेळगृहे,डिस्कोथेक इ्रत्यादी करमणुक साधनांवरील कर,व अधिभार वसुल करणे, जातीचे दाखले,उपन्नाचे दाखले, वारस दाखले, वास्तव्य़ दाखले,नॉन क्रिमिलेअर दाखले, जेष्ठ नागरिक ओळखपत्रे, वितरीत करणे,३०% महिला आरक्षण इत्यादी कामे केली जातात. फार मोठया प्रमाणावर तालुक्यामधील लोकसंख्य़ेमध्ये वाढ होत असल्याने नोकरी व्यवसायामध्ये तसेच शैक्षणिक कामाकरिता वेगवेगळे दाखले मिळविण्यासाठी दाखल करण्यात येणा-या अर्जाचा संख्येमध्ये लक्षणिय वाढ होत आहे. या तालुक्यातील दाखले देण्यासाठी सेतु केंद्राची स्थापना करण्यात आली असुन एक ख्डिकी योजनेतर्गत सर्व दाख्ल्याच्या अर्जाची विक्री व अर्ज स्वीकारुन दाखल्याचे वितरण सेतुमार्फत केले जाते.

जास्त वेळ लोकांना रांगेत उभे राहावे लागु नये याबाबत काळजी घेतली जाते, तरीसुध्दा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला फार मोठया प्रमाणावर अर्ज दाखल होत असल्यामुळे एवढया अर्जाचा निपटारा करुन लोकाना विहित वेळेत दाखले निर्गमित करणे अवघड होवून बसते. अशावेळी कामाचे नियोजन करुन उपलब्ध़ कर्मचा-याकडून सर्वसाधारण जनतेला दाखले विहित वेळेत मिळतील याबाबत काळजी घेतली जाते.अकृषिक सा-याच्या वसुली बृहन्मुंबई महान गरपालिकडे वर्ग करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. तसेच सुधारित अकृषिक सा-याची वसुली करणेबाबतसुध्दा शासनाने स्थ्गिती दिलेली आहे. त्यामुळे वसुलीचे काम जवळजवळ ठप्प़ झालेले आहे.

अंधेरी तालुकया़मध्ये मुख्यत्वे दळणवळणाची साधने रेल्वे,टॅक्सी,बस,असुन घाटकोपर ते अंधेरी दरम्यान मेटो रेल्वे आहे. या तालुक्यामध्ये १७ कि.मी. लांबीचा रेल्वमार्ग आहे. व आंतरराष्टीय व डेमोस्टीक विमानतळ सांताक्रुझ /विलेपार्ले येथे आहे. या विभागामध्ये बृहन्मुबई महानगरपालिकेची ४ विभाग कार्यालये असुन १८ पोलीस ठाणे,१५ टपाल कार्यालय,१०५ प्राथमिक शाळा,९७ माध्य़मिक शाळा, १८ महाविदयालय आहे. अंधेरी तालुक्यामध्ये बांद्रा पश्चिमेस माउंटमेरी हे जत्रेचे ठिकाण आहे. दरवर्षी येथे मोठया प्रमाणावर लोक दर्शनासाठी येतात. या मढ जुहू बीच यासारखे समुद्रकिनारे असुन तेथे लोकांची गर्दी असते. महाकाली केव्हज,जोगेश्वरी गंफा,गिलबर्ट हिल यासारख्या पुरातन व प्रेक्षणिय स्थळे असुन १७ पंचतारांकित आहेत.

मजास गावामध्ये जोगेश्वरी गुंफा नावाची ऐतिहासिक लेणी असुन यामध्ये पुरातन शिवलिंग आहे. महाशिवरात्रीस येथे मोठी जत्रा भरते. तसेच महाकाली गुंफा व्यारवली गावांत असुन तेथेसुध्दा पुरातन लेणी आहेत. s