पर्यटन

 

 

पर्यटन स्थळे

1 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या उद्यानाला पूर्वी कृष्ण गिरी उपवन असे संबोधिले जात असे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकाच्या पूर्वेला सुमारे 1 कि.मी. अंतरावर असून अतिशय विस्तीर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला अगदी लागून असलेल्या या उद्यानात गर्द वनराई, नदी, डोंगर, वन्य प्राणी, बागबगिचे आणि हिरवळ अशी निसर्ग सौंदर्याची रेलचेल आहे.
कन्हेरी गुंफा (लेणी) पश्चिम रेल्वेवरील बोरीवली या स्थानकापासून पूर्वेकडे सुमारे 9-10 कि.मी. अंतरावर असलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून या लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे. ख्रिस्त पूर्व 200 वर्षे ते 6 व्या दशकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरण्यात आले असाव्यात असे जाणकरांचा दावा आहे. बौध्द धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या कोरण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहे. या ठिकाणी 109 बौध्द विहार असून या विहारातून साधना करण्याऱ्या भिक्षूसांठी भूमिगत पाण्याचे साठे खोदण्यात आले आहे. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुध्दांची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाशिल्प म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
2 आरे कॉलनी पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकाच्या पूर्वेस पश्चिम द्रुतगती मार्गालगत आरे दुग्ध वसाहत असून हे महाराष्ट्रातील पहिली दुग्ध शाळा आहे. मुंबई शहरात सार्वजनिक दूध वितरणाचे कार्य या योजनेमार्फत प्रथम सुरु झाले. या योजनेला अनुषंगुन दूध निर्मिती व पशु – पालनाशी निगडीत असे अनेक उपक्रम उभे राहिले आहेत. या परिसरात बागबगिचे रंगबेरंगी फुलझाडे , हिरवेगार वृक्ष असे निसर्ग सौंदर्य या परिसरात आहे.
3 छोटा कश्मिर आरे कॉलनी मध्ये छोटा कश्मीर नावाचा एक भव्य उद्यान आहे. तऱ्हेतऱ्हेचे रंगबेरंगी फुलझाडे मऊशार हिरवळ, नारळीचे व इतर हिरवेगार वृक्ष्‍ यामुळे हे उद्यान जिवंत दिसते. या निसर्ग पार्श्वभूमीमुळेच या उद्यानात चित्रपटाचे बाहेरी चित्रीकरण केले जाते. आजपर्यंत अनेक नव्या जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रीत करण्यात आले आहे. याच परिसरात पुढे दोन अडीच कि.मी. अंतरावर आणखी एक विस्तीर्ण उद्यान असून पिकनीक स्पॉट साठी प्रसिध्द आहे.
4 विहार तलाव आरे कॉलनीच्या परिसरात विहार तलाव हे अतिशय भव्य व विस्तीर्ण जलाशय आहे. मुंबई शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या जलाशयाची ‍ उभारणी ब्रिटीशांनी इ.स. 1860 मध्ये केली. नंतरच्या काळात या जलाशयाभोवतालचा परिसर विकसित करुन बगीचे व वनराईने तो शुशोभित करण्यात आला. विहार तलाव हे मुंबई उपनगरातील एक अतिशय प्रेक्षणीय व निसर्गरम्य स्थळ बनले आहे.
5 तुळशी तलाव हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात मौजे तुळशी येथे तुळशी तलाव हे अतिशय विस्तीर्ण जलाशय आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या तलावाची निर्मीती करण्यात आली असून आजूबाजुचा परिसर अतिशय रम्य असा आहे. या परिसरात शासकीय विश्रामगृह आहे.
6 एस्सेल वर्ल्ड पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकाच्या पश्चिमेस सुमारे 4-4.5 कि.मी. अंतरावर असलेल्या खाडीच्या पलिकडे 196 एकर क्षेत्रावर एस्सेल वर्ल्ड ॲम्युसमेंट पार्क आहे. या पार्कमध्ये अत्याधुनिक विविध प्रकारचे राईडस आहेत. या ॲम्युसमेंट पार्कमध्ये परदेशी पर्यटक या स्थळाला भेटी देत असतात. या परिसरातील निसर्ग सौंदर्य व त्या ठिकाणी असलेले विविध प्रकारचे खेळ यामुळे आभाळवृध्दांचे मन हिरावून घेतले जातात.
7 वॉटर किंग डम वॉटर किंग डम हे एस्सेल वर्ल्ड ॲम्सुसमेंट पार्कचा भाग असून त्यामध्ये जलतरण तलाव, विविध कारंजे व पाण्यावर आधारीत विविध प्रकारचे राईडस याठिकाणी आहेत. या ठिकाणी उन्हाळयाच्या दिवसात भारतीय व परदेशी पर्यटकांची फारच रेलचेल असते
8 ग्लोबल पगोडा हे एस्सेल वर्ल्ड लगत असून श्री. सत्यनारायण वयंका यांनी ग्लोबल पगोडा विपशना केंद्राची स्थापना 1997 मध्ये केली असून सदरची वास्तु सन 2000 मध्ये बांधण्यात आली. ग्लोबल पगोडाला 3 शिखरे आहेत. सदरचे विपशना आंतरराष्ट्रीय दर्जेचे असून त्यामध्ये भारतीय व परदेशी पर्यटक भेट देत असतात. सदरची विपशना केंद्र सर्व भारतीयांना निशुल्क प्रवेश दिला जातो.
9 मार्वे बीच उपनगरातील वस्तीपासून लांब अंतरावर असलेल्या मार्वे समुद्ऱ किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यावर पर्य़टकांची मोठया पमाणावर वरदळ असते. हा किनारा अजूनही बराचसा स्व़च्छ़ व शांत आहे. या ठिकाणी गणेश विसर्ज़न सुध्दा केले जाते.
10 गोराई बीच पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकाच्या पश्चिमेस 4-5 कि.मी. अंतरावर असलेल्या खाडीपलीकडे गोराई बीच आहे. त्या ठिकाणी छोटी छोटी रिसोर्ट़ असून सामान्य़ माणसांना परवडेल अशा अल्प़ दरात तेथे पर्य़टकांना राहण्याची व्य़वस्था आहे. तेथे निसर्ग़ सौंदर्य़ असून नाराळाची झाडे व हिरवळ आहे. त्यामुळे तेथे पर्य़टकांचे केंद्ऱ आहे. .
11 आकसा बीच आकसा बीच हे वर्सोवा मार्वे रोड लगत समुद्र किनारा असून तेथे पर्य़टकांची बरीच गर्दी असते. सदर समुद्र किनारा स्व़च्छ़ व शांत आहे. त्या ठिकाणी गणेश विसर्ज़नासाठी बरीच गर्दी असते. .