• Slide

  अक्साबीच

 • Slide

  मार्वे बीच

 • Slide

  गोराईबीच

 • Slide

  तुलसीतलाव

 • Slide

  राष्ट्रीय उद्यान

 • Slide

  वॉटर किंगडम

 • Slide

  ग्लोबल पागोडा

बोरीवली तालुका

इ.स. 1817 मध्ये उत्त़र कोकणातून ठाणे जिल्हा निर्माण करण्यात आला. तेव्हा साष्टी हा भूभाग तालुका म्हणून समाविष्ट़ करण्यात आला. सन 1920 साष्टी तालुक्याची विभागणी होऊन दक्षिण व उत्त़र साष्टी असे दोन स्व़तंत्र तालुके अस्तित्वात आले. या मूळ साष्टी तालुक्यात 84 गावांचा समावेश होता. ही गावे बांद्रा ते दहिसर व कुर्ला ते मुंलूड या गावातील होती. सन 1920 मध्ये दक्षिण साष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 84 गावांचा मुंबई उपनगर जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यावेळी मुंबई उपनगर जिल्हयात दोन तालुक्यांचा अंर्तभाव होता. त्यापैकी बोरीवली तालुक्यातील गावे ही ठाणे जिल्हयातून मुंबई उपनगर जिल्हयात समाविष्ट करण्यात आली व दक्षिण साष्टी तालुक्याचे रुंपातर अंधेरी तालुक्यात करण्यात आले.

सन 1962 मध्ये बोरीवली तालुक्यातील काही गावे आणि दक्षिण साष्टी तील काही गावे यातून कुर्ला व अंधेरी असे दोन तालुके अस्तित्वात आले म्हणजेच आजचा मुंबई उपनगर जिल्हा कुर्ला , अंधेरी व बोरीवली अश्या तीन तालुक्यांनी भरलेला आहे.

बोरीवली तालुका हा गोरेगाव पासून ते दहिसर पर्यंत पसरलेला असून या तालुक्यात अनेक म्हत्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चित्रनगरी, आरे वसाहत, एसेल वर्ल्ड, कान्हेरी गुंफा, तुळशी तलाव, विहार तलाव, अक्सा, मार्वे, मनोरी बीच, आय.एन.एस. हमला व पश्चिम बाजूने समुद किनारा लाभलेला आहे.

बोरीवली तालुक्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक स्थान, प्रेक्षणीय / पर्यटन स्थळे संजय गांधी निराधार योजना इ. या संकेतस्थळ स्थळांशी जोडण्यात आली आहे. हे संकेतस्थळ स्थळ मुख्यत: सर्व साधारण माहितीच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. आम्ही आमच्या सर्व परीने बोरीवली तालुक्यातील सर्वसामान्य़ माणसांना आवश्यक असलेली विविध क्षेत्रातील माहिती अंर्तभूत करण्याचा प्रयत्ऩ केला आहे.

या व्य़तिरिक्त् विशिष्ट़ व सविस्तर माहितीसाठी उपभोक्त्यांनी या कार्यालयाशी व्यक्तीश: संपर्क साधावा. मला खात्री आहे की, हे संकेतस्थळ स्थळ माहिती प्रसारासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त् ठरेल.