लोकशाही दिन

सन 1999 पासून शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा-1099/सीआर-23/99/18-अ दि.29/12/99 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन आयोजित करण्यात येत होता. सदर लोकशाही दिनांत नागरिंकाचे तक्रारीचे निवारण झाले नाही तर जनतेला न्याय मिळण्यासाठी शासन परिपत्रक क्र.प्रसूधा/1001/प्र.क्र.70/2001/18-अ दि.10/11/2001 अन्वये मंत्रालय लोकशाही दिन मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत आहे.
त्यानंतर सदर कार्यपध्दतीत सुधारणा होऊन शासन परिपत्रक क्र. प्रसूधा/1002/सीआर-69/2002/18-अ दि.22/7/2002 अन्वये महिन्याच्या दुस-या सोमवारी विभागीय स्तरावर मा.विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षते खाली लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संबधितीतील नागरिकांचे तक्रारीचे निवारण जलद गतीने होण्यासाठी शासन परिपत्रक क्र.महालो/1007/212/प्रक्र 53/07/18-अ दि.7/11/2007 अन्वये बृहन्मुंबई,पुणे व नागपूर या महानगरपालिका प्रमाणेच उर्वरित सर्व महानगरपालिकांमध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.सदर दिवशी अर्जदार यांनी त्यांची तक्रार लोकशाही दिनी स्वत:सादर करावयाचे असतात.
शासन परिपत्रक क्र प्रसूधा-2011/प्रक्र 189/11/18-अ दि.26/9/2012 अन्वये तालूका / जिल्हा / महानगरपालिका / विभागीय / मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत एकत्रित आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

प्रशासकीय अधिकारी

अ.क्र. लोकशाही दिन स्तर लोकशाही दिनाचा दिव अर्जाचा विहित नमुना
1 तालुका स्तर प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी Download
2 जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी Download
3 विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी Download
4 मंत्रालय स्तर प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी Download

 

वरीलप्रमाणे प्रत्येक स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणा-या कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो.

ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरिता आचारसहिंता लागू असल्यास लागू करण्यात आलेली असल्यास अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात येऊ नये.असे शासनाचे आदेश आहेत.

तालुका लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार असतील जिल्हाधिकारी लोकशाही दिनामध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी,महानगरपालिका लोकशाही दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संबधित महानगरपालिका आयुक्त विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असतील मंत्रालय लोकशाही दिनाचे अध्यक्ष मा मख्यमंत्री असतील.

वरील चारही स्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमासंबधीत स्तरावरील मुख्यालय ठिकाणी 10.00 वाजता आयोजित करण्यात येते.

अर्ज स्विकृती निकष

* अर्जदार यांनी त्यांचा अर्ज विहित नमुन्यात करावा ( नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड)
* तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावी.
* चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.
* तालुका लोकशाही दिनांनतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी /महानरपालिका आयुक्त लोकशाही दिनांत अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनांनंतर दोन महिन्याने विभागीय लोकशाही दिनांत व विभागीय आयुक्त लोकशाही दिनांनंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनांत अर्ज करता येईल.

कोणत्या विषयावरील अर्ज स्विकारले जात नाहीत ?

* न्यायप्रविष्ठ प्रकरणे
* राजस्व/ अपिल्स.
* सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी
* विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज
* अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषया संदर्भात केलेले अर्ज
* तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर
* वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसांत पाठविण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारासह पुष्टाकिंत करावी.

Caution/Disclaimer: The content in this website is the result of a collaborative effort of various district departmental offices, at the District level. The available contents on website provided by various departments of Collector office, Mumbai Suburban District and uploaded by website administrator of Collector office Mumbai Suburban District, the content ownership belong to Collector, Mumbai Suburban District. This website is designed and developed by Collector Office Mumbai Suburban District, Bandra. The Information provided on website is only for information purpose it can not be used for any Legal / Judicial purpose.
(c) हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.