Tourist Places

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान :-


या उद्यानाला पूर्वी कृष्ण गिरी उपवन असे संबोधिले जात असे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकाच्या पूर्वेला सुमारे 1 कि.मी. अंतरावर असून अतिशय विस्तीर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला अगदी लागून असलेल्या या उद्यानात गर्द वनराई, नदी, डोंगर, वन्य प्राणी, बागबगिचे आणि हिरवळ अशी निसर्ग सौंदर्याची रेलचेल आहे.


कन्हेरी गुंफा (लेणी) :-


पश्चिम रेल्वेवरील बोरीवली या स्थानकापासून पूर्वेकडे सुमारे 9-10 कि.मी. अंतरावर असलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून या लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे. ख्रिस्त पूर्व 200 वर्षे ते 6 व्या दशकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरण्यात आले असाव्यात असे जाणकरांचा दावा आहे. बौध्द धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या कोरण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहे. या ठिकाणी 109 बौध्द विहार असून या विहारातून साधना करण्याऱ्या भिक्षूसांठी भूमिगत पाण्याचे साठे खोदण्यात आले आहे. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुध्दांची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाशिल्प म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.


आरे कॉलनी :-


पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकाच्या पूर्वेस पश्चिम द्रुतगती मार्गालगत आरे दुग्ध वसाहत असून हे महाराष्ट्रातील पहिली दुग्ध शाळा आहे. मुंबई शहरात सार्वजनिक दूध वितरणाचे कार्य या योजनेमार्फत प्रथम सुरु झाले. या योजनेला अनुषंगुन दूध निर्मिती व पशु – पालनाशी निगडीत असे अनेक उपक्रम उभे राहिले आहेत. या परिसरात बागबगिचे रंगबेरंगी फुलझाडे , हिरवेगार वृक्ष असे निसर्ग सौंदर्य या परिसरात आहे.


छोटा कश्मिर :-


आरे कॉलनी मध्ये छोटा कश्मीर नावाचा एक भव्य उद्यान आहे. तऱ्हेतऱ्हेचे रंगबेरंगी फुलझाडे मऊशार हिरवळ, नारळीचे व इतर हिरवेगार वृक्ष्‍ यामुळे हे उद्यान जिवंत दिसते. या निसर्ग पार्श्वभूमीमुळेच या उद्यानात चित्रपटाचे बाहेरी चित्रीकरण केले जाते. आजपर्यंत अनेक नव्या जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रीत करण्यात आले आहे. याच परिसरात पुढे दोन अडीच कि.मी. अंतरावर आणखी एक विस्तीर्ण उद्यान असून पिकनीक स्पॉट साठी प्रसिध्द आहे.


विहार तलाव :-


आरे कॉलनीच्या परिसरात विहार तलाव हे अतिशय भव्य व विस्तीर्ण जलाशय आहे. मुंबई शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या जलाशयाची ‍ उभारणी ब्रिटीशांनी इ.स. 1860 मध्ये केली. नंतरच्या काळात या जलाशयाभोवतालचा परिसर विकसित करुन बगीचे व वनराईने तो शुशोभित करण्यात आला. विहार तलाव हे मुंबई उपनगरातील एक अतिशय प्रेक्षणीय व निसर्गरम्य स्थळ बनले आहे.


तुळशी तलाव :-


हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात मौजे तुळशी येथे तुळशी तलाव हे अतिशय विस्तीर्ण जलाशय आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या तलावाची निर्मीती करण्यात आली असून आजूबाजुचा परिसर अतिशय रम्य असा आहे. या परिसरात शासकीय विश्रामगृह आहे.


एस्सेल वर्ल्ड :-


पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकाच्या पश्चिमेस सुमारे 4-4.5 कि.मी. अंतरावर असलेल्या खाडीच्या पलिकडे 196 एकर क्षेत्रावर एस्सेल वर्ल्ड ॲम्युसमेंट पार्क आहे. या पार्कमध्ये अत्याधुनिक विविध प्रकारचे राईडस आहेत. या ॲम्युसमेंट पार्कमध्ये परदेशी पर्यटक या स्थळाला भेटी देत असतात. या परिसरातील निसर्ग सौंदर्य व त्या ठिकाणी असलेले विविध प्रकारचे खेळ यामुळे आभाळवृध्दांचे मन हिरावून घेतले जातात.


वॉटर किंग डम :-


वॉटर किंग डम हे एस्सेल वर्ल्ड ॲम्सुसमेंट पार्कचा भाग असून त्यामध्ये जलतरण तलाव, विविध कारंजे व पाण्यावर आधारीत विविध प्रकारचे राईडस याठिकाणी आहेत. या ठिकाणी उन्हाळयाच्या दिवसात भारतीय व परदेशी पर्यटकांची फारच रेलचेल असते


ग्लोबल पगोडा :-


हे एस्सेल वर्ल्ड लगत असून श्री. सत्यनारायण वयंका यांनी ग्लोबल पगोडा विपशना केंद्राची स्थापना 1997 मध्ये केली असून सदरची वास्तु सन 2000 मध्ये बांधण्यात आली. ग्लोबल पगोडाला 3 शिखरे आहेत. सदरचे विपशना आंतरराष्ट्रीय दर्जेचे असून त्यामध्ये भारतीय व परदेशी पर्यटक भेट देत असतात. सदरची विपशना केंद्र सर्व भारतीयांना निशुल्क प्रवेश दिला जातो.


मार्वे बीच :-


उपनगरातील वस्तीपासून लांब अंतरावर असलेल्या मार्वे समुद्ऱ किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यावर पर्य़टकांची मोठया पमाणावर वरदळ असते. हा किनारा अजूनही बराचसा स्व़च्छ़ व शांत आहे. या ठिकाणी गणेश विसर्ज़न सुध्दा केले जाते.


गोराई बीच :-


पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकाच्या पश्चिमेस 4-5 कि.मी. अंतरावर असलेल्या खाडीपलीकडे गोराई बीच आहे. त्या ठिकाणी छोटी छोटी रिसोर्ट़ असून सामान्य़ माणसांना परवडेल अशा अल्प़ दरात तेथे पर्य़टकांना राहण्याची व्य़वस्था आहे. तेथे निसर्ग़ सौंदर्य़ असून नाराळाची झाडे व हिरवळ आहे. त्यामुळे तेथे पर्य़टकांचे केंद्ऱ आहे.


आकसा बीच :-


आकसा बीच हे वर्सोवा मार्वे रोड लगत समुद्र किनारा असून तेथे पर्य़टकांची बरीच गर्दी असते. सदर समुद्र किनारा स्व़च्छ़ व शांत आहे. त्या ठिकाणी गणेश विसर्ज़नासाठी बरीच गर्दी असते. .


दुर्गामाता मंदिर :-


सुमारे ६५ मिलियन वर्षापूर्वी झालेल्या ज्वालामुखीतुन अंधेरी पश्चिम येथे असणारा गिलबर्ट हिल डोंगर तयार झाला आहे. हा डोगर काळया बेसॉल्ट खडकापासुन बनलेला असुन उभ्या सरळ खांबा सरळ प्रमाणे दिसतो. त्यांची उंची २०० फुट आहे. संपुर्ण आशिया खंडात असणारा असा हा एकमेव डोगरा आहे. या डोगराच्या माथ्यावर सुमारे ४५० वर्षापासुन स्वयंभु दुर्गामातेचे जागृत मंदिर आहे. दरवर्षी हनुमान जयंतीलरा मंदिरात मोठी यात्रा भरते.दुर्गामातेचा पालखी सोहळा असतो. त्यावेळेस हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. नवरात्र उत्सव,महाशिवरात्री,मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवार इत्यादी देखिल मोठया उत्स़ाहात येथे साजरे केले जातात


जोगेश्वरी गुंफा :-


जोगेश्वरी गुंफा जमिनीखाली काही फुट असुन पुर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूनी प्रवेश आहे. प्रवेशव्दारात अडीचशे फुटाचे अंतर आहे. दोन्ही बाजुनी खाली उतरुन जाण्याकरिता बारा फुट रुद पायऱ्या आहेत. प्रवेशव्दाराचे अंतर लहान आहे. पश्चिमेकडील प्रवेशव्दार अर्धमंडप आहे. पूर्वे प्रवेशाशी लहान-मोठे असे तीन अर्धमंडप आहेत. त्यावरुन प्रवेशव्दार महत्वाचे मानले जाते. गुंफांच्या मध्यभागी असलेला सभामंडप आकाराने खुप मोठा,प्रशस्त आहे.मध्यभागी जोगेश्श्वरी देवीच्या मंदिराचा गाभारा आहे. सभामंडपाच्या दक्षिणेला भरभक्म खांबाची रांग असलेली मोठी पडवी आहे. तिथे कित्येक भटजी शांती किंवा पुजापाठ करताना दिसतात. दक्षिेणेला शंकराचे मंदिर आहे. तिथुन पुढे गेले की छोटेसे हनुमान मंदिर दिसत. पश्चिमेच्या पायथ्याशी गणपती मंदिर आहे. तिथे एक छोटा सभामंडप आहे. तिथे काही दगडी कोरीव मुर्ती भगनावस्थेत आढळतात.गोंगाट नसल्यामुळे आजुबाजुचे विदयार्थी तिथे अभ्यासासाठी येतात. जोगेश्वरी माता मंदिर,शिवशंकर आणि गणपती मंदिर हि सगळी मंदिर स्वयंभु असल्याच सागितले जात. महाशिवरात्री आणि नवरात्रीला इथे मोठा उत्स़व असतो. हिंदु शिल्प स्थापत्य़कलेवर बौध्द़ स्थापत्यकलेचा मोठा परिणाम झाला.


महाकाली लेणी :-


महाकाली लेणी या कोडिवटी या नावाने ओळखले जातात. या लेणी मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्टिय उदयाननात वसलेल्या आहेत. हि डोगरावरील लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने,त्यांना महाकाळ असे असे म्हटले गेले आहे. महाकाली गुंफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले महाकालीचे मंदिरावरुन या लेण्यांना महाकाली हे नांव पडले आहे. लेण्यामध्ये बुध्दाच्या लेण्या आहेत. बुध्दाच्या एकुण १९ लेण्या असुन विविध स्तुपही पाहायला मिळतात. अंधेरी स्थानकावरुन बस,व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचु शकता. सन-२०१३ च्या सर्वेनुसार १२,३३४ चौ.कि क्षेत्राावर गुंफा विस्तारलेली आहे


जुहू चौपाटी :-


जुहु कोळीवाडा ते मोरांगांव अशी ४.५ कि.मी लांबीची चौपाटी लाभली आहे. हे स्थळे अंधेरी स्टेशनपासुन अंदाजे ४.कि.मी.असुन त्या ठिकाणी जाण्यासाठी बस,रिक्षा,टॅक्सीची सोय आहे. चौपाटीवर शनिवार,रविवार व इमत सुटीच्या दिवशी मोठया प्रमाणवर पर्यटक येत असतात.गणपती विर्सजन,छटपुजा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवुन सण साजरे करतात. चौपाटीवरील साफसफाईचे काम बृहन्मुबई महानगर पालिका करते.समुद्रात येणा-या भरती-ओहोटीचे फलक लावले आहे.समुद्रात घडु नये म्हणुन लाईफ गार्डची सोय केली आहे.


मढ किल्ला :-


मौजे मढ येथे एक प्राचीन किल्ला आहे. सदर किल्याला जाण्यासाठी वर्सोवा गावातुन बोटीने मढ येथे जावून तेथुन अंदाजे २ ते ३ कि.मी. आत जावे लागते.तेथे जाण्यासाठी खजगी वहाने उपलब्ध़ आहेत. सदर किल्ला आज रोजी केंद्र सरकार एअर फोर्स (हवाई दल) यांचे ताबयात आहे. त्यामुळे तेथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही


माउंटमेरी :-


अंधेरी तालुक्यामध्ये बांद्रा पश्चिमेस माउंटमेरी हे जत्रेचे ठिकाण आहे. दरवर्षी येथे मोठया प्रमाणावर लोक दर्शनासाठी येतात


दादासाहेब फाळके चित्रनगरी (Flim City) :-


मुंबई चित्रनगरी. भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील एक सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून भारतात निर्मिती होणाऱ्या चित्रपटांपैकी ६० टक्के वाटा मुंबई चित्रपट उद्योगाचा आहे. भारतातील मुंबईत गोरेगांव येथे एकत्रित कलागारे संकुल उभारण्यात आले आहे.यामध्ये काही ध्वनिमुद्नन कक्ष,बागबगीचे,तलाव,चित्रपटगृह,मैदान इ.चा समावेश असून याचा बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेतला आहे. चित्रनगरीची स्थापना महाराष्ट्र राज्याने चित्रपट उद्योगास पायाभूत सुविधा व सवलती देण्यासाठी केली आहे.भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी असे करण्यात आले आहे.


वांद्रे-वरळी सागरी महामार्ग :-


वांद्रे-वरळी सागरी मार्ग (Bandra–Worli Sea Link) हा मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. अरबी समुद्रावर बांधला गेलेला हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून याची योजना डी.ए.आर. कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केली. ३० जून २००९ रोजी वांद्रे-वरळी सेतू वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. वांद्रे-वरळी सागरी मार्गाच्या उत्तर टोकापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाची सुरूवात होते.


वांद्रे कुर्ला संकुल (B.K.C) :-


वांद्रे कुर्ला संकुल संक्षिप्त प्रकारे बी.के.सी ( BKC) असे म्हटले जाते. हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे.

Caution/Disclaimer: The content in this website is the result of a collaborative effort of various district departmental offices, at the District level. The available contents on website provided by various departments of Collector office, Mumbai Suburban District and uploaded by website administrator of Collector office Mumbai Suburban District, the content ownership belong to Collector, Mumbai Suburban District. This website is designed and developed by Collector Office Mumbai Suburban District, Bandra. The Information provided on website is only for information purpose it can not be used for any Legal / Judicial purpose.
(c) हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.