• Slide

    फ्लेमिंगो

  • Slide

    हिरानंदानी

  • Slide

  • Slide

    फ्लेमिंगो

  • Slide

कुर्ला (मुलुंड) तालुका

कुर्ला तालुका हा मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पुर्व बाजुस वसलेला असुन ठाणे व ऐरोली मार्गे मुंबईचे प्रवेशव्दार म्हणुन ओळखला जातो. पुर्वेला ठाणे खाडी, पश्चिमेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, दक्षिणेला अरबी समुद्राचा काही भाग व मुंबई शहराचा भाग (सायन) आणि उत्तरेला ठाणे जिल्हा व बोरीवली तालुक्याचा भाग कुर्ला तालुक्याच्या हद्दीवर येतो. औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्टया संपन्न असलेल्या कुर्ला तालुक्यात 29 महसूली गावांचा समावेश होतो.

ब्रिटीश राज्यामध्ये मुलुंड ते कुर्ला पर्यंत पसरलेल्या साष्टी तालुक्यातील बहुतांश भाग हा सध्याच्या कुर्ला तालुक्यात समाविष्ट होतो. इ.स. 1817 मध्ये उत्त़र कोकणातून ठाणे जिल्हा निर्माण करण्यात आला. तेव्हा साष्टी हा भूभाग तालुका म्हणून समाविष्ट़ करण्यात आला. सन 1920 साष्टी तालुक्याची विभागणी होऊन दक्षिण व उत्त़र साष्टी असे दोन स्व़तंत्र तालुके अस्तित्वात आले. या मूळ साष्टी तालुक्यात 84 गावांचा समावेश होता. ही गावे बांद्रा ते दहिसर व कुर्ला ते मुंलूड या गावातील होती. सन 1920 मध्ये दक्षिण साष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 84 गावांचा मुंबई उपनगर जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यावेळी मुंबई उपनगर जिल्हयात दोन तालुक्यांचा अंर्तभाव होता. त्यापैकी बोरीवली तालुक्यातील गावे ही ठाणे जिल्हयातून मुंबई उपनगर जिल्हयात समाविष्ट करण्यात आली व दक्षिण साष्टी तालुक्याचे रुपांतर अंधेरी तालुक्यात करण्यात आले. सन 1962 मध्ये बोरीवली तालुक्यातील काही गावे आणि दक्षिण साष्टी तील काही गावे यातून कुर्ला व अंधेरी असे दोन तालुके अस्तित्वात आले. म्हणजेच आजचा मुंबई उपनगर जिल्हा कुर्ला अंधेरी व बोरीवली अशा तीन तालुक्यांनी बनलेला आहे.

मुलुंड तालुक्यात जॉन्सन ॲण्ड जॉन्सन, हेक्स्ट, वेलकम, मेरींड एसीसी, बॉम्बे ऑसीजन, रिचर्डसन कुडास, आर.सी.एफ., गोदरेज, प्रिमीअर कंपनी व मुकुंद स्टील ह्या रुपाने अनेक कारखाने/ कंपन्या चालु होत्या. जागतिकरणाबरोबर औद्योगिकरणा खालील जमीनी कमी होऊन अनेक कंपन्याच्या जागेवर बहूमजली मॉल, व्यापारी केंद्रे, बहूमजली रहिवाशी संकुले उभारली गेली. निर्मल लाईफ स्टाईल, आर मॉल या सारख्या व्यापारी केंद्राबरोबरच फोर्टीज सारखे सुसज्ज वैद्यकिय केंद्र उभारली गेले.

आयआयटी पवई, सौमय्या ट्रस्ट, मुलुंड कॉमर्स कॉलेज, केळकर- वझे महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, झुणझुणवाला कॉलेज, मेनन कॉलेज भांडुप, आय.टी.आय. विद्याविहार, मुलुंड अशा नामांकित शैक्षणिक संस्था या तालुक्यात उपलब्ध झालेल्या आहेत.

पूर्व द्रुतगती मार्गाबरोबरच ईस्टर्न फ्रि वे, एल.बी.एस. मार्ग, मध्य रेल्वे (कुर्ला ते मानखुर्द) व हार्बर रेल्वे (कुर्ला ते मुलुंड) या वाहतुकीच्या सं-साधनामुळे रहिवास संकुलनाचा आणि नागरीकांचा मुलुंड तालुक्यात राहण्याचा ओढा वाढताना दिसुन येतो. मोनो रेल व मेट्रो रेल अलीकडील काळातील वाहतुकीच्या नविन सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.

या तालुक्यातील मुलुंड खाडी ते भांडूप खाडी (पंपींग स्टेशन) व माहुल खाडी येथे फ्लेमिंग पक्षांचे परीक्षण करण्यासाठी पर्यटक भेट देत असतात.
लहान मुलांसाठी किडझेनिया करमणुकीचे केंद्र हे या तालुकयाचे मौजे घाटकोपर गावाच्या हद्दीमध्ये आहे. .
राष्ट्रीय सुरक्षीतेच्या दृष्टीतुन महत्त्वाचे भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर (BARC) हे अनुसंशोधन केंद्र हे या तालुक्याचे मौजे माहुल, तुर्भे व चेंबुर या गावांच्या हद्दीमध्ये आहे.

कुर्ला तालुक्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक स्थान, संजय गांधी निराधार योजना इ. या संकेतस्थळ स्थळांशी जोडण्यात आली आहे. हे संकेतस्थळ स्थळ मुख्यत: सर्व साधारण माहितीच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. कुर्ला तालुक्यातील सर्वसामान्य़ माणसांना आवश्यक असलेली विविध क्षेत्रातील माहिती अंर्तभूत करण्याचा प्रयत्ऩ केला आहे.

या व्य़तिरिक्त विशिष्ट़ व सविस्तर माहितीसाठी उपभोक्त्यांनी या कार्यालयाशी व्यक्तीश: संपर्क साधावा. मला खात्री आहे की, हे संकेतस्थळ स्थळ माहिती प्रसारासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त् ठरेल.

FAQ

About Tahsil

Database

Contact Us