बंद

मुंबई चित्रनगरी

मुंबई चित्रनगरी. भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील एक सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून भारतात निर्मिती होणाऱ्या चित्रपटांपैकी ६० टक्के वाटा मुंबई चित्रपट उद्योगाचा आहे. भारतातील मुंबईत गोरेगांव येथे एकत्रित कलागारे संकुल उभारण्यात आले आहे.यामध्ये काही ध्वनिमुद्नन कक्ष,बागबगीचे,तलाव,चित्रपटगृह,मैदान इ.चा समावेश असून याचा बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेतला आहे.चित्रनगरीची स्थापना महाराष्ट्र राज्याने चित्रपट उद्योगास पायाभूत सुविधा व सवलती देण्यासाठी केली आहे.भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी असे करण्यात आले आहे.

  • चित्रनगरी गोरेगांव
  • चित्रनगरी गोरेगांव,मुंबई

कसे पोहोचाल?:

विमानाने

मुंबई चित्रनगरी पासून जवळचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई हे आहे.

रेल्वेने

मुंबई चित्रनगरी पासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक पश्चिम रेल्वेवर गोरेगांव रेल्वे स्थानक आहे.

रस्त्याने

मुंबई चित्रनगरी पासून जवळ चे बस स्थानक गोरेगांव बस स्थानक आहे.