Close

District Planning Committee Meeting

मुंबई उपनगर जिल्हा, जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

दिनांक. 28.01.2021

        जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर जिल्हयाची बैठक मा.ना.श्री. आदित्य उद्धव ठाकरे, मंत्री, पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 28 जानेवारी, 2021 रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीस मा.ना.श्री.सुभाष देसाई, मा. मंत्री, उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा, मा.ना. श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक, मा. मंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता, मा.ना. अ‍ॅड. अनिल दत्तात्रय परब, मा. मंत्री, परिवहन, संसदीय कार्ये, मा.ना. श्री. अस्लम रमजान अली शेख, मा. मंत्री, वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे व मा.श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, मा. महापौर, बृहन्मुंबई महानगर पालिका इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच उपनगर जिल्ह्यातील सन्माननीय खासदार,  आमदार व जिल्हा नियोजन समिती सदस्य हे ऑनलाईन उपस्थित होते.

        मुंबई उपनगर जिल्हयाच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन 2021-22 या वर्षामध्ये राबवावयाच्या विविध योजना व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय याबाबतचे सादरीकरण श्री. मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी  केले. मुंबई उपनगर जिल्हयासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 319.36 कोटी, समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत 51.14 कोटी तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी 5.59 कोटी अशा एकुण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडयास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

      लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या. तसेच विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.  त्यानुसार संबंधित विभागांनी त्याची दखल घ्यावी तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मा.पालकमंत्री यांनी दिले.

        सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नगर विकास-(सौंदर्यीकरण), गृह निर्माण(संरक्षण भिंत), उर्जा, शिक्षण, परिवहन, पर्यटन, शासकीय कार्यालय व प्रशासकीय इमारती, इ. विविध योजनांसाठी रू.123.88 कोटीचा  नियतव्यय वाढवून मिळण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मागणी करण्यात येईल, असे मा. पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

Photo Gallery

 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital
 • digital

Back to top of page