बंद

उपविभाग आणि विभाग

प्रशासकीय सुविधेसाठी मुंबई उपनगर जिल्हा 2 उप विभागांमध्ये विभागले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दोन महसूल विभाग पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर आहेत.उप विभागीय अधिकारी (एसडीओ / एसडीएम) विभागाचा प्रमुख असून उपविभागीय अधिकारी हा सहाय्यक जिल्हाधिकारी, आयएएस किंवा उपजिल्हाधिकारी कॅडर मधील आहेत . ते त्यांच्या विभागात कार्यरत असलेले उप विभागीय न्यायदंडाधिकारी आहेत. उपविभागीय कार्यालये जिल्हाधिकारी यांची प्रतिकृती असून ते प्रशासकीय व्यवस्थेत मध्यस्थ म्हणून कार्य करतात. प्रत्येक विभागात काही तालुक्यांचा समावेश असतो ज्याचे कार्यप्रदर्शन संबंधित विभागीय कार्यालयांकडून सतत देखरेख करतात. जिल्ह्यातील अंधेरी ,बोरिवली व कुर्ला तालुक्यातील तहसीलदार, मंडल अधिकारी,तलाठी व बिल कलेक्टर यांच्या कार्यालयावर एसडीओ किंवा एसडीएमचे नियंत्रण व देखरेख आहे.

अ.क्र उपविभाग उपविभागीय अधिकार्‍याचे नाव पद दूरभाष कार्यालय पत्ता
1 पूर्व उपनगर उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर उपविभागीय अधिकारी  022-25111126

उपविभागीय अधिकारी कार्यालय, पूर्व उपनगर, निळकंठ कॉम्प्लेक्स, बस डेपो मागे, विद्याविहार (प.), मुंबई

2 पश्चिम उपनगर उपविभागीय अधिकारी पश्चिम उपनगर उपविभागीय अधिकारी  022-26510136

उपविभागीय अधिकारी कार्यालय मुंबई पश्चिम उपनगर ,9 वा मजला, प्रशासकीय इमारत,

सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व़) मुंबई – 400051.

उप विभागीय अधिकारी यांची कर्तव्ये :

कोर्टाचे काम :

तहसीलदाराने दिलेल्या आदेशासंबंधात त्याच्यासमोर दाखल केलेले सर्व केस ऐकण्यासाठी

  1. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता , 1966 अंतर्गत अधिकारांचे रेकॉर्ड
  2. मुंबई टेनेंसी अँड ऍग्रीकल्चरल लँड ऍक्ट, 1948 इत्यादी अंतर्गत भाडेकरू प्रकरणे
  3. महाराष्ट्र पुनर्वसन भूमी अनुसूचित जमाती अधिनियमाच्या 1974 च्या अंतर्गत अनुसूचित जमातींना जमिनीची पुनर्संग्रहित करण्यासंबंधीची प्रकरणे ऐकण्यासाठी.

सक्षम प्राधिकारी : 

एसडीओ हे एम.पी.आय.डी. कायदा अंतर्गत सक्षम प्राधिकारी आहे.

न्यायालयीन व दंडाधिकारी कार्य : 

जिल्ह्याचे उप-विभागीय दंडाधिकारी म्हणून पोलिसांच्या गोळीबाराच्या प्रकरणांची चौकशी,पोलीस कोठडी मृत्यू चे अहवाल शासन व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (एनएचआरसी) सादर करणे.

उत्खननाची परवानगी : 

एम.एल.आर. कोड 1966 अंतर्गत 1000 ब्रास पर्यंत.

जाती प्रमाणपत्र जारी करणे : 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, डीटी, एनटी आणि गैर-क्रिमी लेअर प्रमाणपत्रे (बोरिवली तालुका).

सोलवेंसी प्रमाणपत्र : 

रू. 5 लाख पर्यंत.

इतर कार्य : 

  • विविध कायद्यांनुसार आणि शासकीय आदेशानुसार.
  • महाराष्ट्र भूमि महसूल संहितेच्या 1966 च्या कलम 45 अंतर्गत अनधिकृत नॉन-एग्रीकल्चर (अकृषी) वापराची किंवा वापरात बदल प्रकरणांची तपासणी करणे व एनएए लागू करणे व दंड वसूल करणे.
  • बॉम्बे टेनेंसी अँड ऍग्रीकल्चरल लँड ऍक्ट, 1948 च्या कलम 43 नुसार विक्री परवानगी.

कार्यालय पत्ता : 

उपविभागीय अधिकारी कार्यालय, 9 वा मजला, प्रशासकीय इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई

दूरभाष : 26556799

उप विभागीय अधिकारी यांची कर्तव्ये :

कोर्टाचे काम :

तहसीलदाराने दिलेल्या आदेशासंबंधात त्याच्यासमोर दाखल केलेले सर्व केस ऐकण्यासाठी

  1. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता , 1966 अंतर्गत अधिकारांचे रेकॉर्ड
  2. मुंबई टेनेंसी अँड ऍग्रीकल्चरल लँड ऍक्ट, 1948 इत्यादी अंतर्गत भाडेकरू प्रकरणे
  3. महाराष्ट्र पुनर्वसन भूमी अनुसूचित जमाती अधिनियमाच्या 1974 च्या अंतर्गत अनुसूचित जमातींना जमिनीची पुनर्संग्रहित करण्यासंबंधीची प्रकरणे ऐकण्यासाठी.

सक्षम प्राधिकारी : 

एसडीओ हे एम.पी.आय.डी. कायदा अंतर्गत सक्षम प्राधिकारी आहे.

न्यायालयीन व दंडाधिकारी कार्य : 

जिल्ह्याचे उप-विभागीय दंडाधिकारी म्हणून पोलिसांच्या गोळीबाराच्या प्रकरणांची चौकशी,पोलीस कोठडी मृत्यू चे अहवाल शासन व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (एनएचआरसी) सादर करणे.

उत्खननाची परवानगी : 

एम.एल.आर. कोड 1966 अंतर्गत 1000 ब्रास पर्यंत.

जाती प्रमाणपत्र जारी करणे : 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, डीटी, एनटी आणि गैर-क्रिमी लेअर प्रमाणपत्रे (कुर्ला तालुका).

सोलवेंसी प्रमाणपत्र : 

रू. 5 लाख पर्यंत.

इतर कार्य : 

  • विविध कायद्यांनुसार आणि शासकीय आदेशानुसार.
  • महाराष्ट्र भूमि महसूल संहितेच्या 1966 च्या कलम 45 अंतर्गत अनधिकृत नॉन-एग्रीकल्चर (अकृषी) वापराची किंवा वापरात बदल प्रकरणांची तपासणी करणे व एनएए लागू करणे व दंड वसूल करणे.
  • बॉम्बे टेनेंसी अँड ऍग्रिकल्चरल लँड ऍक्ट, 1948 च्या कलम 43 नुसार विक्री परवानगी.

कार्यालय पत्ता : 

उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पूर्व उपनगर निळकंठ कॉम्प्लेक्स, बस डेपो मागे, विद्याविहार (प.), मुंबई.

दूरभाष : 25111126