प्रशासकीय सुविधेसाठी मुंबई उपनगर जिल्हा 2 उप विभागांमध्ये विभागले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दोन महसूल विभाग पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर आहेत.उप विभागीय अधिकारी (एसडीओ / एसडीएम) विभागाचा प्रमुख असून उपविभागीय अधिकारी हा सहाय्यक जिल्हाधिकारी, आयएएस किंवा उपजिल्हाधिकारी कॅडर मधील आहेत . ते त्यांच्या विभागात कार्यरत असलेले उप विभागीय न्यायदंडाधिकारी आहेत. उपविभागीय कार्यालये जिल्हाधिकारी यांची प्रतिकृती असून ते प्रशासकीय व्यवस्थेत मध्यस्थ म्हणून कार्य करतात. प्रत्येक विभागात काही तालुक्यांचा समावेश असतो ज्याचे कार्यप्रदर्शन संबंधित विभागीय कार्यालयांकडून सतत देखरेख करतात. जिल्ह्यातील अंधेरी ,बोरिवली व कुर्ला तालुक्यातील तहसीलदार, मंडल अधिकारी,तलाठी व बिल कलेक्टर यांच्या कार्यालयावर एसडीओ किंवा एसडीएमचे नियंत्रण व देखरेख आहे.
अ.क्र | उपविभाग | उपविभागीय अधिकार्याचे नाव | पद | दूरभाष | कार्यालय पत्ता |
---|---|---|---|---|---|
1 | पूर्व उपनगर | उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर | उपविभागीय अधिकारी | 022-25111126 |
उपविभागीय अधिकारी कार्यालय, पूर्व उपनगर, निळकंठ कॉम्प्लेक्स, बस डेपो मागे, विद्याविहार (प.), मुंबई |
2 | पश्चिम उपनगर | उपविभागीय अधिकारी पश्चिम उपनगर | उपविभागीय अधिकारी | 022-26510136 |
उपविभागीय अधिकारी कार्यालय मुंबई पश्चिम उपनगर ,9 वा मजला, प्रशासकीय इमारत, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व़) मुंबई – 400051. |