भूमी अभिलेख विभाग राज्याच्या महसूल प्रशासनातील महत्वाचा भाग असून या विभाग तर्फे जमिनीशी संबंधित अभिलेख जतन करणे, जमिनीची मोजणी ,नागरी भागात भूमि अभिलेखांचे जतन व संवर्धनाबरोबरच परिरक्षणाचे काम करण्यात येते . राज्यातील जनतेला विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधा तात्काळ व विना अडथळा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विभागामार्फत https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/
संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे . या संकेतस्थळावरून नागरीक्षेत्रासाठी खालील सेवा जनतेसाठी पुरविण्यात येतात
सेवा
अ. क्र. | पुरविण्यात येणारी सेवा | संकेत स्थळ |
1 | मिळकत पत्रिका | https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr |
2 | नकाशे | https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html |
3 | जुने अभिलेख ई- रेकॉर्डस |
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords |
4 | ई-हक्क P.D.E. वारस फेरफार नोंदी | https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin |
5 | ई – मोजणी | https://emojni.mahabhumi.gov.in/emojni/mojani/pgLogin.aspx |
6 |
अपील प्रकरणे (e-Quasi Judicial Courts) |
https://eqjcourts.gov.in/startup/default.php |
7 |
आपली चावडी (डिजिटल नोटिस बोर्ड) |
https://echawadicitizen.mahabhumi.gov.in/ |
8 |
आपले सरकार |
https://aaplesarkar.mahaonline.gov.in |
मालमत्ता पत्रक माहिती प्रणाली संकेतस्थळ :- https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
ई -पीसीआयएस ही वेब – आधारित सेवा असून ती मालमत्ता पत्रक (शहरी अधिकार अभिलेख ) यांच्या संगणीकरण आणि डिजिटायझेशनसाठी विकसित
करण्यात आलेली आहे आणि त्या मध्ये ऑनलाईन फेरफार द्वारे मालमत्ता पत्रक अद्यावत करता येतात . जनतेसाठी ऑनलाईन मिळकत पत्रिका या संकेतस्थळावर उपलभ आहेत.
भू नकाशा – मिळकतीचे डिजीटाईझ्ड नकाशे संकेतस्थळ:- https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html
भू नकाशा या प्रणालीमध्ये अधिकार अभिलेखांचे तपशील गाव नमुना नंबर ७/१२, नगर भूमापन क्रमांक ,सर्व्हे क्रमांक ,डिजीटाईझ्ड गाव नकाशा गट नंबरशी / नगर भूमापन क्रमांकाशी जोडलेले आहे. जेणेकरून वापरकर्त्याला मिळकत पत्रिका सातबारा अभिलेखातील क्षेत्र आणि भोगवटादार यांचे नाव तपासण्यास मदत करतील. सदर वेबसाइट वर नागरिकांना त्यांचे मिळकतीचा सिटी सर्व्हे नंबर/ गट नंबर नकाशा ऑनलाईन उपलब्ध आहे
ई- रेकॉर्डस (जुने अभिलेख)संकेतस्थळ:- https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords ई- रेकॉर्ड या प्रकल्पामध्ये भूमि अभिलेख विभागात उपलब्ध असणा-या जुन्या भूमापन अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. यामध्ये चौकशी, वसलेवार, जुन्या मिळकत पत्रिका इ. अभिलेख ई-रेकॉर्ड या वेबसाईटवर जनतेकरीता Online उपलब्ध आहेत.
ई-हक्क P.D.E. वारस फेरफार नोंदीसंकेतस्थळ:- https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin वारस नोंदी करणेकामी अर्जदार यांना प्रत्यक्षात कार्यालयात जाणेची आवश्यकता नाही. नागरिकांना वारस नोंदीचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करता येतात.
ई-मोजणी – मोजणी प्रकरणांचे व्यवस्थापन संकेतस्थळ:- https://emojni.mahabhumi.gov.in/emojni/mojani/pgLogin.aspx
ई-मोजणी आज्ञावली मध्ये नागरिकांना मोजणी अर्जावर अचूकपणे प्रक्रिया होण्यास मदत झालेली आहे. तसेच नागरिकांना मोजणीची तारीख, मोजणीची वेळ, भूकरमापकाचे नाव, मोजणी फी इत्यादी महत्वाची माहिती त्यांनी अर्ज करताच मिळते.
अपील प्रकरणे – EQJ Courts (e-Quasi Judicial Courts) – संकेतस्थळ :- https://eqjcourts.gov.in
नगर भूमापन अधिकारी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदी, तसेच इतर कार्यवाही विरुध्द संबंधित पक्षकार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडे अपील दाखल करुन दाद मागणी करतात. सदर अपील प्रकरणी उपरोक्त वेबसाईटवर अपील प्रकरणाचे छाननीअंती अपील नंबर देऊन अपीलदार, जाबदार यांची नोंद केली जाते. अपील प्रकरणी सुनावणीचा रोजनामा Online टंकलिखीत केला जातो. तसेच अपील प्रकरणात आदेश पारीत झालेनंतर झालेला आदेश या वेबसाईटवर अपलोड केला जातो. जनतेला सदर वेबसाईटवर रोजनामा, अपलोड केलेला आदेश पहाता येतो. आवश्यक तर अर्जदार यांनी अर्ज केलेनंतर त्यांना सदर अपलोड केलेल्या आदेशाची प्रमाणित प्रत इकडील कार्यालयात अर्ज करुन प्राप्त करुन घेता येते.
आपलीचावाडी (डिजिटल नोटिस बोर्ड) – संकेतस्थळ :- https://echawadicitizen.mahabhumi.gov.in/ महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून प्रदान केलेल्या सेवांच्या सर्व लागू केलेल्या अर्जांची स्थिती शोधण्यासाठी डिजिटल सूचना मंडळ प्लॅटफॉर्म.
जनतेच्या तक्रारीचे निवारण आपले सरकार Public Grievance Portal संकेतस्थळ:- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
नागरिकांना कार्यालयात न येता “आपले सरकार” पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने आपल्या तक्रारींचे निराकरण करू शकतात.
महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी,नागरिक संबंधित जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय आणि शहर सर्वेक्षण कार्यालये, मुंबई उपनगर जिल्हा यांना ईमेल पाठवू शकतात आणि त्यांच्या तक्रारी येथे दाखल करू शकतात