• सामाजिक दुवे
  • साइटमॅप
  • Accessibility Links
बंद

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

या उद्यानाला पूर्वी कृष्ण गिरी उपवन असे संबोधिले जात असे. राष्ट्रीय उदयन हे 104 चौ.कि.मी. क्षेत्रफळ विशाल परिसरात पसरलेले आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकाच्या पूर्वेला सुमारे 1 कि.मी. अंतरावर असून अतिशय विस्तीर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला अगदी लागून असलेल्या या उद्यानात गर्द वनराई, नदी, डोंगर, वन्य प्राणी, बागबगिचे आणि हिरवळ अशी निसर्ग सौंदर्याची रेलचेल आहे.

छायाचित्र दालन

संग्रहदालन पहा

कसे पोहोचाल? :

विमानाने  

संजय गांधी राष्ट्रीय उद्याना पासून सर्वात जवळचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेवरील बोरिवली रेल्वे स्थानक आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरीवली स्टेशनपासून साधारण 1 किमी अंतरावर आहे.

रस्त्याने  

संजय गांधी नॅशनल पार्क जवळच्या बस स्टेशनला बोरिवली बस स्थानक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली बस स्थानकापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे.