बंद

कसे पोहोचाल?

मुंबई हे भारतातील एक महानगरीय शहर आहे. मुंबईपर्यंत पोहचण्यासाठी अनेक वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत. आपण मुंबई उपनगर जिल्ह्यात हवाई, रेल्वे आणि रस्त्यामार्गे पोहोचू शकता.

विमान :

जवळचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. हे विमानतळ दुबई, मॉरीशस, कुआलालंपुर, लंडन, हॉंगकॉंग, अॅम्स्टरडॅम, अबू धाबी, गोवा, लखनऊ, दिल्ली, जेद्दाह, सिंगापूर आणि अन्य अनेक देशांशी जोडणारा आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 4 किमी अंतरावर सांताक्रूज डोमेस्टिक विमानतळ आहे. विमानतळ 24*7 कार्यरत आहे. दोन्ही विमानतळांमधून टॅक्सी, ऑटो आणि बसेसची सेवा सहज उपलब्ध आहेत.

रेल्वे : 

जवळचे रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल व लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानक, कुर्ला आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि बॉम्बे सेंट्रल हे दोन प्रमुख रेल्वे स्थानके आहेत जे मुंबईला देशाच्या विविध भागाशी जोडतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पश्चिम, पूर्व आणि मध्य भारतातून येणाऱ्या रेल्वेगाडया थांबतात. बॉम्बे सेंट्रल स्टेशनमध्ये सामान्यत: उत्तर भारता मधुन येणाऱ्या रेल्वेगाडया आहेत.शहरा प्रवासासाठी लोकल ट्रेन हा अजून एक पर्याय आहे.

रस्ता :

मुंबई हे शहर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आणि इतर राज्य ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन बसेस यांच्या माध्यमातून उत्तमरीत्या जोडलेले आहे. मुंबई सेंट्रल, परळ आणि बोरिवली हे जवळील बस स्थानक आहे. मुंबई हे राष्ट्रीय महामार्गांच्या मदतीने भारतातील विविध शहरांशी जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, 17, 8, 9, 50 आणि 3 द्वारे आप मुंबई शहरात पोहोचू शकतो. पुणे, नाशिक, औरंगाबाद, गुजरात, महाबळेश्वर, गोवा, पंचगनी आणि इतर पश्चिम भारतातील आंतरराज्य बस सेवा उपल्बध आहे. मुंबईत येण्यासाठी किंवा मुंबईतून बाहेर गावी प्रवास करण्यासाठी प्रवासी लक्झरी किंवा बजेट बसेस निवडू शकतात. शहराची वाहतूक सेवा खूप चांगली आहे. ऑटो, टॅक्सी आणि बसची सहज उपलब्धता आहे.