जिल्हा निवडणूक अधिकारी :
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत. निवडणूक कार्यालय हे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांना निवडणूक व आस्थापना प्रकरणाशी संबंधित दैनंदिन कर्यात सहाय्यता प्रदान करते. निवडणूक शाखेचे प्रमुख उप जिल्हा निवडणूक अधिकारी असतात व त्यांना 2 तहसीलदार, 4 नायब तहसीलदार, अव्वल कारकून लिपिक, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी आणि बूथ स्तर अधिकारी सहकार्य करतात.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची कर्तव्ये :
- निवडणूक नोंदणी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे.
- निवडणूक यादीची तयारी आणि पुनर्रचना करणे.
- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्र तयार करणे.
- पदवी आणि शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार यादी तयार करणे.
- भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाअंतर्गत लोकसभा व विधानसभेची निवडणूक आयोजित करणे.
- मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आयोजित करणे.
- मुंबई उपनगर जिल्ह्यात नोंदणीकृत कार्यालय असलेल्या विशिष्ट सहकारी संस्था (बँक) चे निवडणूक आयोजित करणे.
-
जिल्हा निवडणूक कार्यालय प्रशासकीय रचना.
- जिल्हा निवडणूक कार्यालय प्रशासकीय रचना (पीडीएफ, 94 KB)
-
तालुका-निहाय विधानसभा मतदारसंघ.
- तालुका-निहाय विधानसभा मतदारसंघ (पीडीएफ, 18 KB)
-
विधानसभा मतदारसंघांचे स्थान व संपर्क क्रमांक.
- विधानसभा मतदार संघांचे संपर्क (पीडीएफ, 1 MB)
-
मैं भारत हूं, ECI गीत.
- हिंदी आवृत्ती
- बहुभाषिक आवृत्ती
मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघातील मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारांची यादी
- मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघातील मुंबई शिक्षक मतदारांची यादी
- मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघातील मुंबई पदवीधर मतदारांची यादी
लोकसभा मतदारसंघ आणि त्यांचे विधानसभा विभाग :
मुंबई उपनगर जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक संसदीय मतदारसंघाचे नेतृत्व निर्वाचन अधिकारी करतात आणि सहाय्यक निर्वाचन अधिकारी त्यांची सहायता करतात. प्रत्येक संसदीय मतदार संघ विधानसभा विभागांमध्ये विभागला जातो.
मतदार याद्या संबंधी अर्जाचे नमुने :
अर्ज नमुन्याचे नाव | अर्ज नमुना |
---|---|
नवीन मतदारांसाठीचाअर्जाचा नमुना. | नमुना 6 (पीडीएफ, 662 KB) |
मतदार यादी प्रमाणिकरण करण्यासाठी आधार क्रमांकांच्या माहितीबाबतचे पत्र. | नमुना 6 ब (पीडीएफ, 444 KB) |
प्रस्तावित समावेशाबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी / विद्यमान मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी करायचा मतदार अर्ज नमुना. | नमुना 7 (पीडीएफ, 545 KB) |
रहिवाशाचे स्थलांतर कळवण्यासाठी / विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्त करण्यासाठी / मतदार ओळखपत्र बदलून देणे / दिव्यांग म्हणून चिन्हांकित करणे यासाठी मतदार अर्ज नमुना. | नमुना 8 (पीडीएफ, 498 KB) |