भूमी अभिलेख

सर्वेक्षण शाखा ही जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्या कार्यालयातील एक महत्त्वाची शाखा आहे. ही शाखा राज्यात होणाऱ्या सर्वेक्षण कामाच्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवते. सीमा निश्चिती, पोट हिस्सा, बिगरशेती, भूसंपादन, न्यायालयीन आयोग इत्यादी विविध प्रकारचे मोजमाप तालुका स्तरावर काम करणाऱ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केले जातात. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि उपसंचालक भूमी अभिलेख अनुक्रमे त्यांच्या जिल्ह्यात आणि विभागात या कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात. विभागात सर्वेक्षण तंत्रांच्या आधुनिकीकरणासाठी विविध पावले उचलली जात आहेत. सर्वेक्षण शाखा सर्वेक्षण आणि संबंधित पैलूंमध्ये धोरणात्मक पातळीवरील बदलांवर देखील काम करते आणि सरकारला प्रस्तावित करते.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र
राज्य,
२ रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत,
काउन्सिल हॉल समोर, आगरकर नगर,
पुणे, महाराष्ट्र ४११००१
दूरध्वनी:०२०-२६०५०००६
उपसंचालक भूमी अभिलेख, कोकण प्रदेश
६६/६८ एल, पहिला मजला, डी डी बिल्डिंग, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र – ४००००१
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा
कार्यालयाचा पत्ता:
१० वा मजला,प्रशासकीय इमारत, चेतना कॉलेज सरकारी कॉलनीजवळ, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००५१
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा
मुंबई उपनगर जिल्ह्यातील नगर भूमापनाचे काम सन १९६३-१९७० च्या कालावधीत झाले आहे . मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ८६ गावांचा समावेश असून त्या सर्व ८६ गावांचे नगर भूमापन अभिलेखांचे जतन व परिरक्षण भूमी अभिलेख कार्यालयां मार्फत केले जाते .सर्व गावांसाठी स्वतंत्रपणे मिळकतीचे धारक निहाय मिळकत पत्रिका व नकाशा १:५०० चा परिमाणात तयार करण्यात आला आहे .
यात प्रामुख्याने मिळकतीची मोजणी ( सीमा निस्चती ,पोटहिस्सा ,बिनशेती , भूसंपादन ,रोड सेटबॅक,इ )विविध प्रकारचे मोजणी चे काम ,तसेच मिळकती चे फेरफार ( खरेदी ,बक्षिसपत्र, हक्कसोड ,वारस ,गहाणखत , इ .) द्वारे मिळकतीवर होणाऱ्या हस्तांतरणाची नोंद घेऊन अभिलेख अद्यावत ठेवण्याचे कामकाज केले जाते.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख ,मुंबई उपनगर जिल्हा यांचे अखत्यारीत १० नगर भूमापन कार्यालये व १ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येत असून त्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून ते कामकाज करतात . तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे जिल्हाधिकारी यांचे तांत्रिक सल्लागार आणि नगर भूमापन अधिकारी यांचे अपिलीय अधिकारी म्हणून ते कामकाज पाहतात .
मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ तालुके अंधेरी,कुर्ला ,बोरिवली असून नगर भूमापन कार्यालय निहाय कार्यक्षेत्र खालील प्रमाणे आहे.
अ. क्र. | कार्यालय | अधिकाऱ्याचे नाव | कार्यालयाचा पत्ता | ई-मेल आयडी व दूरध्वनी क्र . | कार्यक्षेत्रातील गावे |
---|---|---|---|---|---|
1. | जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा |
श्री. कृष्णात कणसे | 10 वा मजला, प्रशासकीय इमारत, चेतना महाविद्यालयाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400051 |
dslr.msd@gmail.com 022-65010894 |
मुंबई उपनगर जिल्हा |
2. | नगर भूमापन अधिकारी, चेंबूर | श्री. मिलिंद भोळे | टोपीवाला महाविद्यालय परिसर, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-400080 |
ctsochembur80@gmail.com 022-25619876 |
चेंबूर, बोर्ला, वाढवली, माहुल, आणिक, मरावली, तुर्भे, मानखुर्द, मांदळे, माण बुद्रुक |
3. | नगर भूमापन अधिकारी, घाटकोपर | श्री. सुजित जाधव | तहसीलदार कुर्ला कार्यालय परिसर, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड(पश्चिम), मुंबई-400080 |
ctsoghatkopar@gmail.com 022-25642228 |
तुंगवा, चांदिवली, असल्फा, किरोळ, घाटकोपर-किरोळ, घाटकोपर, विक्रोळी, हरियाली, देवनार |
4 | नगर भूमापन अधिकारी, कुर्ला | श्री. पंकज फेगडे | तळ मजला, टोपीवाला महाविद्यालय परिसर कॉलेज बिल्डिंग, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-400080 |
ctsokurla@gmail.com 022-25695771 |
कुर्ला, मोहिली, साकी |
5 | नगर भूमापन अधिकारी, मुलुंड | श्री. दिनेश ढोकळे | पहिला मजला, टोपीवाला कॉलेज बिल्डिंग, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-400080 |
ctsomulund@gmail.com 022-25619878 |
नाहूर, मुलुंड, भांडुप, कांजूर, तिरंदाज, पवई, कोपरी, पासपोली |
6 | नगर भूमापन अधिकारी, अंधेरी | श्री. योगेश्वर सावकार | सरदार वल्लभभाई पटेल नगर, श्री स्वामी समर्थ नगर रोड, वेसावे, अंधेरी (पश्चिम), मुंबई-400053 |
ctsoandheri@gmail.com 022-26362674 |
आंबिवली, बांदिवली, ओशिवरा, वर्सोवा, मढ, मजास, अंधेरी, इस्मालिया, मोगरा |
7 | नगर भूमापन अधिकारी, वांद्रे | श्री. सुरज कावळे | महसूल भवन, 4था आणि 5वा मजला, वांद्रे स्टेशनच्या बाजूला, बस डेपो समोर, वांद्रे(पश्चिम), मुंबई-400050 |
bandractso@gmail.com 022-26128110 |
वांद्रे, परिघाखाडी, कोळे-कल्याण |
8 | नगर भूमापन अधिकारी, विलेपार्ले | श्री. दत्तात्रय सातपुते | पहिला मजला, म्युनिसिपल मोटर गॅरेज कंपाउंड, मिलन सबवे, एस. व्ही. रोड, सांताक्रूझ(पश्चिम), मुंबई-400054 |
ctsovileparle@gmail.com 022-26183202 |
जुहू, विलेपार्ले, ब्राम्हणवाडा, गुंदवली, चकाला, कोंदिविटा, बाफनाळा, परजापूर, मुळगाव, व्यारवली, सहार, मरोळ |
9 | नगर भूमापन अधिकारी, बोरिवली | श्री. उमेश झेंडे | 4था मजला प्रशासकीय इमारत, नाटकवाला लेन, मुंबई रोड, एस. 400092. |
ctsoborivali@gmail.com 022-28075045 |
बोरिवली, कांदिवली, मानोरी, गोराई, कान्हेरी, मागाठाणे, मंडपेश्वर, एकसर, दहिसर, शिंपावली, चारकोप |
10 | नगर भूमापन अधिकारी, गोरेगाव | श्री. रणजित देशमुख | B.E.S.T.अधिकारी कॉलनी, दादासाहेब रुपवते रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-400104 |
ctsogoregaon@gmail.com 022-26773435 |
पोईसर, वलणई, वाढवण, दारिवली, आकुर्ली, एरंगळ, मालवणी, मार्वे, आक्सा, पहाडी-एकसर, पहाडी-गोरेगाव |
11 | नगर भूमापन अधिकारी, मालाड | श्री. अमर ढोकळे | प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, नाटकवाला लेन, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-400092 |
maladctso@gmail.com 022-28636397 |
मालाड, गोरेगाव, आरे, चिंचवली, दिंडोशी, कुरार, क्लेराबाद, गुंडेगाव, तुळशी, साई |
12 | उपअधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा |
श्री. विकास राणे | 5 वा मजला, प्रशासकीय इमारत, चेतना कॉलेजजवळ, सरकारी कॉलनी, मुंबई पूर्व, महाराष्ट्र-400051 |
dyslrmsd@gmail.com 022-26511957 |
मुंबई उपनगर जिल्हा |
सेवा
भूमी अभिलेख विभाग राज्याच्या महसूल प्रशासनातील महत्वाचा भाग असून या विभाग तर्फे जमिनीशी संबंधित अभिलेख जतन करणे, जमिनीची मोजणी ,नागरी भागात भूमि अभिलेखांचे जतन व संवर्धनाबरोबरच परिरक्षणाचे काम करण्यात येते . राज्यातील जनतेला विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधा तात्काळ व विना अडथळा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विभागामार्फत https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/
संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे . या संकेतस्थळावरून नागरीक्षेत्रासाठी खालील सेवा जनतेसाठी पुरविण्यात येतात
मालमत्ता पत्रक माहिती प्रणाली
ई -पीसीआयएस ही वेब – आधारित सेवा असून ती मालमत्ता पत्रक (शहरी अधिकार अभिलेख) यांच्या संगणीकरण आणि डिजिटायझेशनसाठी विकसित करण्यात आलेली आहे आणि त्या मध्ये ऑनलाईन फेरफार द्वारे मालमत्ता पत्रक अद्यावत करता येतात . जनतेसाठी ऑनलाईन मिळकत पत्रिका या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
भू नकाशा – मिळकतीचे डिजीटाईझ्ड नकाशे
भू नकाशा या प्रणालीमध्ये अधिकार अभिलेखांचे तपशील गाव नमुना नंबर ७/१२, नगर भूमापन क्रमांक ,सर्व्हे क्रमांक ,डिजीटाईझ्ड गाव नकाशा गट नंबरशी / नगर भूमापन क्रमांकाशी जोडलेले आहे. जेणेकरून वापरकर्त्याला मिळकत पत्रिका सातबारा अभिलेखातील क्षेत्र आणि भोगवटादार यांचे नाव तपासण्यास मदत करतील. सदर वेबसाइट वर नागरिकांना त्यांचे मिळकतीचा सिटी सर्व्हे नंबर/ गट नंबर नकाशा ऑनलाईन उपलब्ध आहे
ई- रेकॉर्डस (जुने अभिलेख) संकेतस्थळ
ई- रेकॉर्ड या प्रकल्पामध्ये भूमि अभिलेख विभागात उपलब्ध असणा-या जुन्या भूमापन अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. यामध्ये चौकशी, वसलेवार, जुन्या मिळकत पत्रिका इ. अभिलेख ई-रेकॉर्ड या वेबसाईटवर जनतेकरीता Online उपलब्ध आहेत.
ई-हक्क P.D.E. वारस फेरफार नोंदी
वारस नोंदी करणेकामी अर्जदार यांना प्रत्यक्षात कार्यालयात जाणेची आवश्यकता नाही. नागरिकांना वारस नोंदीचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करता येतात.
ई-मोजणी – मोजणी प्रकरणांचे व्यवस्थापन
ई-मोजणी आज्ञावली मध्ये नागरिकांना मोजणी अर्जावर अचूकपणे प्रक्रिया होण्यास मदत झालेली आहे. तसेच नागरिकांना मोजणीची तारीख, मोजणीची वेळ, भूकरमापकाचे नाव, मोजणी फी इत्यादी महत्वाची माहिती त्यांनी अर्ज करताच मिळते.
अपील प्रकरणे – e-Quasi Judicial Courts
नगर भूमापन अधिकारी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदी, तसेच इतर कार्यवाही विरुध्द संबंधित पक्षकार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडे अपील दाखल करुन दाद मागणी करतात. सदर अपील प्रकरणीपारीत झालेला आदेश या वेबसाईटवर अपलोड केला जातो. जनतेला सदर वेबसाईटवर रोजनामा, अपलोड केलेला आदेश पहाता येतो. सदर अपलोड केलेल्या आदेशाची प्रमाणित प्रत इकडील कार्यालयात अर्ज करुन प्राप्त करुन घेता येते.
संकेत स्थळआपली चावडी (डिजिटल नोटिस बोर्ड)
महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून प्रदान केलेल्या सेवांच्या सर्व लागू केलेल्या अर्जांची स्थिती शोधण्यासाठी डिजिटल सूचना मंडळ प्लॅटफॉर्म.
संकेत स्थळजनतेच्या तक्रारीचे निवारण आपले सरकार
नागरिकांना कार्यालयात न येता “आपले सरकार” पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने आपल्या तक्रारींचे निराकरण करू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी,नागरिक संबंधित जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय आणि शहर सर्वेक्षण कार्यालये, मुंबई उपनगर जिल्हा यांना ईमेल पाठवू शकतात आणि त्यांच्या तक्रारी येथे दाखल करू शकतात
संकेत स्थळयेथे SCAN करा
