बंद

छोटा कश्मिर

आरे कॉलनी मध्ये छोटा कश्मीर नावाचा एक भव्य उद्यान आहे. तऱ्हेतऱ्हेचे रंगबेरंगी फुलझाडे मऊशार हिरवळ, नारळीचे व इतर हिरवेगार वृक्ष यामुळे हे उद्यान जिवंत दिसते.या निसर्ग पार्श्वभूमीमुळेच या उद्यानात चित्रपटाचे बाहेरी चित्रीकरण केले जाते. आजपर्यंत अनेक नव्या जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रीत करण्यात आले आहे. याच परिसरात पुढे दोन अडीच कि.मी. अंतरावर आणखी एक विस्तीर्ण उद्यान असून पिकनीक स्पॉट साठी प्रसिध्द आहे.

  • छोटा कश्मिर
  • छोटा कश्मिर

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळ्चे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई हे आहे.

रेल्वेने

छोटा कश्मिर पासून सर्वात जवळचे पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव हे रेल्वे स्थानक आहे.

रस्त्याने

छोटा कश्मिर पासून सर्वात जवळ चे बस स्थानक गोरेगाव बस स्थानक आहे