बंद

कन्हेरी गुंफा

पश्चिम रेल्वेवरील बोरीवली या स्थानकापासून पूर्वेकडे सुमारे 9-10 कि.मी. अंतरावर असलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून या लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे.ख्रिस्त पूर्व 200 वर्षे ते 6 व्या दशकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरण्यात आले असाव्यात असे जाणकरांचा दावा आहे. बौध्द धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या कोरण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहे. या ठिकाणी 109 बौध्द विहार असून या विहारातून साधना करण्याऱ्या भिक्षूसांठी भूमिगत पाण्याचे साठे खोदण्यात आले आहे. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुध्दांची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाशिल्प म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

  • Kanheri Caves.
  • कन्हेरी गुंफा

कसे पोहोचाल?:

विमानाने

कन्हेरी गुंफापासून जवळचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांता क्रूझ, मुंबई हे आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वेस्थानक पश्चिम रेल्वेवर बोरिवली रेल्वे स्थानक आहे. कन्हेरी लेणी बोरिवली स्टेशनपासून 8 ते 10 किमी अंतरावर आहे.

रस्त्याने

कन्हेरी गुंफा पासून जवळ चे बस स्थानक हे बोरिवली बस स्थानक आहे. कन्हेरी गुंफा बोरिवली बस स्थानकापासून सुमारे 8-10 किमी अंतरावर आहे.