बंद

इतिहास

  • ईसवी सन १७३४ मध्ये मुंबई बेटे व आसपासचा परिसर पोर्तूगीजांच्या अमला खाली होता. साधारण १७६०-६१ मध्ये पोर्तूगीजांनी हा प्रदेश ब्रीटनच्या महाराणीला भेट म्हणून दिला. मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मीती होण्या पुर्वी या भू-भागाचे नाव साष्टी बेटे होते व ईसवी सन १७७१-७२ पर्यंत हा प्रदेश पोर्तूगीज अमलाखालील गोवा राज्यात समावीष्ट होता. १७७१-७२ नंतर ह्या प्रदेशावर ब्रिटीश साम्राज्याचा अधिकार आला.
  • ईसवी सन १८७१ मध्ये पुर्व कोंकण व मुंबई बेटा अंतर्गत असलेल्या साष्टी तालूक्या पासून ठाणे जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली. ईसवी सन १९१७ मध्ये वांद्रे मुख्यालय असलेला स्वतंत्र महल बनविण्यात आला.
  • ईसवी सन १९२० मध्ये साष्टी तालूक्याची दक्षिण साष्टी व उत्तर साष्टी अशा २ तालूक्यात विभागणी करण्यात आली. ८४ गावे (वांद्रे पासून दहिसर पर्यंत व कुर्ल्या पासून मुलूंड पर्यंत) असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.
  • या वेळी ठाणे जिल्ह्यातून काही गावे वगळून मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आली. ईसवी सन १९६२ मध्ये बोरीवली तालूक्यातील काही गावे व दक्षिण साष्टी तालूक्यातील काही गावे वेगळी करून अंधेरी व कुर्ला तालूक्यांची निर्मिती करण्यात आली
  • तेंव्हा पासून मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ तालूके असून त्याची नावे अंधेरी, बोरीवली व कुर्ला अशी आहेत. या जिल्ह्यात ८७ गावे समाविष्ट आहेत. 1 डिसेंबर 1940 पासून मुंबई उपनगर जिल्हा अस्तित्वात आला.
  • ईसवी सन १९४२ मध्ये तातपुरत्या स्वरूपात बॉंम्बे सबर्बन जिल्ह्यासाठी (सध्याचा मुंबई उपनगर जिल्हा) स्वतंत्र जिल्हाधिकारी पद निर्माण करण्यात आले. परंतू नंतर हे पद रद्द करून जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार जिल्हाधिकारी बॉंम्बे (मुंबई) यांचे कडे देण्यात आला व या साठी मुंबई जिल्हाधिकारी यांचे पदनाम जिल्हाधिकारी मुंबई शहर व उपनगर असे करण्यात आले.
  • ईसवी सन १९५८ मध्ये कामाचे स्वरूप व ताण पाहून मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी पद निर्माण करण्यात आले व जिल्हाधिकारी मुंबई यांचे देखरेखी खाली मुंबई उपनगर जिल्ह्याचा सर्व कार्यभार अतिरीक्त जिल्हाधिकारी यांचे कडे देण्यात आला.
  • अतिरीक्त जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा हे या काळात जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांचे कार्यालयातून मुंबई उपनगर जिल्ह्याचा प्रशासकीय कार्यभार चालवत होते. ०१/१०/१९९० पासून अतिरीक्त जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय उपनगर भागात हलवण्यात आले व त्याच वेळी उपनगर विभागाला बॉंम्बे सबर्बन जिल्हा (मुंबई उपनगर जिल्हा) असे संबोधण्यात आले. सध्या या जिल्ह्याला मुंबई उपनगर जिल्हा असे म्हणतात.
  • मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तरेला वाशीची खाडी, दक्षिणेला माहीमचा पूल कॉज-वे (Causeway), पश्चिमेला अरबी समुद्र आहे व पुर्वेला ठाणे जिल्ह्याची सीमा लागून आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या या प्रशासकीय सीमा आहेत